d

WE ARE BRIDGE OF TALES

Let’s Work Together

Mahim – Mumbai 400016

शास्त्रचर्चेस वाहिलेले पहिले मुक्त मराठी नियतकालिक

आलोक मराठी नियतकालिक

Artboard 1 copy

ब्रिज ऑफ टेल्सबद्दल थोडे

‘ब्रिज ऑफ टेल्स’ ही संस्था कलाकारांमधील व त्यांच्या प्रेक्षकांमधील दरी मिटवण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे. डिजिटल बाजारपेठेतदेखील ब्रिज ऑफ टेल्स सक्रिय आहे. खूप कमी कालावधीत ६५ प्रकल्प ह्या संस्थेने यशस्वी करून दाखवले आहेत. ५० हून अधिक नवोदितांना संधी दिली आहे व २२ हून अधिक जाहीर कार्यक्रम घेतले आहेत. आता पहिल्यांदाच मराठीतील अभ्यासपर लेखनाला चालना देण्यासाठी ब्रिज ऑफ टेल्स पुढाकार घेत आहे.

logo

आलोक

मराठीत शास्त्रीय लेखन व्हावे ह्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन ‘ब्रिज ऑफ टेल्स’ एक नवे कोरे नियतकालिक सादर करत आहे. भारतीय परंपरेत अभ्यासग्रंथांचे लेखन करताना काही विशिष्ट ग्रंथनामे वापरण्याचा प्रघात असे. तोंडओळख व विषयप्रवेश करून देणाऱ्या ग्रंथांना चन्द्रिका (मनुष्यालयचन्द्रिका), कौमुदी (सिद्धान्तकौमुदी) अशी ग्रंथनामे वापरली जात व एखाद्या विषयातील तज्ज्ञांनी अतिशय तर्ककर्कश भाषेत लिहिलेल्या ग्रंथांना प्रकाश (काव्यप्रकाश), आलोक (ध्वन्यालोक) अशी ग्रंथनामे वापरली जात. प्रस्तुत नियतकालिकाचा उद्देश मराठीत विविध ज्ञानशाखांतील शास्त्रीय लेखनाची परंपरा पुनरुज्जीवित करणे हा आहे. त्यामुळे त्याचे नाव आलोक आहे. इथे केवळ तर्ककठोर व शाखाविशिष्ट कार्यपद्धतींचे पालन करून लिहिलेले निबंध प्रकाशित केले जातील.

ह्या नियतकालिकाचे वैशिष्ट्य असे की ह्यातील सर्व सामग्री मुक्त असणार आहे. क्रिएटिव्ह कॉमन्सच्या परवान्यांतर्गत तिचे वितरण होईल व कोणतेही मुद्रणाधिकार राखीव ठेवण्यात येणार नाहीत. अशा पद्धतीने प्रकाशित होणारे हे मराठीतील पहिलेच अकादमिक नियतकालिक असेल. विविध ज्ञानशाखांतील अभ्यासपूर्ण लेखांचे ‘आलोक’मध्ये नेहमीच स्वागत असेल.

अभ्यासोनि प्रकटावे। ना तरी झाकोनि असावे।
प्रकटोनि नासावे। हे बरे नोहे।।
– संत रामदास

आमच्यापर्यंत कसे पोहोचाल?

आमच्यापर्यंत कसे पोहोचाल?