प्रशांत दामले
१९३८ साली सुरेश खरे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील पेशाने शिक्षक. आई नुसती शिक्षित नव्हती तर त्यांचं वाचन अफ़ाट होतं. दोघंही प्रागतिक विचारांची होती. वडील संगीत नाटकांचे षौकी. बाल गंधर्वांची नाटकं त्यांनी कधी चुकवली नाहीत. सुरेश खरेंच्या रंगभूमीच्या आकर्षणाचं कारण कदाचित हेच असू शकेल.
गंमतीची गोष्ट म्हणजे सुरेश खरेंनी नाटकात पहिली भूमिका केली ती वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आणि तीही स्त्री भूमिका, मामा वरेरकरांच्या सत्तेचे गुलाम या नाटकात. शाळेत असतांना त्यांचे शिक्षक श्री मु.अ. जोशी यांनी त्यांचे कलागुण हेरले. ते जोपासले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. महाविद्यालयात शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथं ते कमलाकर सारंग यांच्या संपर्कात आले. सारंगांनी नंदकुमार रावते या प्रतिभावान दिग्दर्शकाशी त्यांची ओळख करुन दिली. आयुष्याला वेगळं वळण देणारी ही घटना.
I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Acting style :
I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.